Ad will apear here
Next
सर्कस सर्कस
अलीकडील काळात सर्कस हा प्रकार खूप कमी झाला आहे. आता जत्रा अथवा शाळेच्या सुटीच्या दिवसांतच सर्कस पाहायला मिळते; मात्र सर्कस ही एक निर्भेळ करमणूक असते. शारीरिक कौशल्याचे प्रदर्शन करण्याचा एक खेळ असतो. खरे तर हा एक चित्तथरारक अनुभव असतो. हा अनुभव श्यामला शिरोळकर यांनी या पुस्तकातून आपल्याला करून दिला आहे.

या पुस्तकात त्यांनी भारतीय सर्कशीप्रमाणेच परदेशातील सर्कशींची विस्तृत माहिती दिली आहे. प्रारंभी त्यांनी भारतातील सर्कशीचा इतिहास सांगितला आहे. ऋग्वेद काळातील रथांच्या शर्यतींचा त्या आढावा घेतात. इजिप्तमधील सर्कशीच्या गमतीजमती दुसऱ्या प्रकरणात समजतात. अमेरिकेच्या सर्कशींचा इतिहास विस्ताराने सांगितला आहे. फ्रेंच, रशियन, जर्मन, सर्कशींची माहिती स्वतंत्र प्रकरणांमधून दिली आहे. सर्कशीतील विदूषकाचे महत्त्व आणि अविभाज्य अंग असलेले प्राणीविश्व यांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.

प्रकाशक :
श्री ऐश्वर्यगणेश प्रकाशन
पाने : २८२
किंमत : ४५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZKJBQ
Similar Posts
सर्कस... सर्कस! माणसाने माणसांसाठी ‘सर्कस’ हे अद्भुत कसरतींचे आणि नेत्रदीपक आविष्कारांचे अफलातून खेळ कधी सुरू केले असतील? ज्ञात इतिहास काय सांगतो? कुठल्या देशांत याचा उगम सापडतो? किती प्रकारचे प्राणी सर्कशीत असतात आणि त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जातं? सुरुवातीपासून आजपर्यंत या खेळात कसकसे बदल होत गेले... अशा सर्व प्रश्नांच्या
युनायटेड वेस्टर्न बँक कोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणुकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाणे ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे
पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे.
पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) वर्षानुवर्ष नियमितपणे आयकर भरणाऱ्यांनासुद्धा आयकर कायद्याची संपूर्ण माहिती नसते. ही माहिती इंग्रजीत उपलब्ध असल्यामुळेसुद्धा ती नीट वाचली जात नाही; पण प्रत्येक करदात्याला हे माहित असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने अरुण गोडबोले यांनी आर्थिक वर्ष २०१८-२०१९साठी हे पुस्तक लेखन केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language